Description
लग्नाची तारीख ठरली होती. माझ्या पसंतीचा मुलगा, आई वडिलांचा हि होकार, मित्र-मैत्रिणी सर्वांची तयारी जोरदार चालली मात्र नेहमीप्रमाणे आई-वडीलांच्या मागे कामाची दगदग. सर्वांसाठी काहि भेटवस्तु घ्यावी म्हणून मी सुद्धा तयारी केली. आखेर ज्यांनी आपल्याला हे आयुष्य दिलं त्यांना तरी काय द्यावं हा प्रश्न मला पडला.
माझे आई वडील म्हणजे सर्वसाधारण माणसात राहणारे पण माझ्या माझ्या साठी असामान्य, असाधारण. यांना माझ्या कडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसणार आहे, हे मला माहिती होते त्यामुळे पैसे, सोने, किंवा दुसरे काही मला द्यायचे नव्हते. मला घर सोडून सासरी जाण्याआधी त्यांना नमन करुन, माझ्या साठी घेतलेल्या कष्टासाठी धन्यवाद द्यायचे होते. म्हणून या पुस्तकात तुम्हाला कुठल्याच पुस्तकात न भेटणारे असे धडे, यांनी मला शिकवलेले स्वाभिमान, सामर्थ व परोपकाराचे पाठ माझ्या मनावर कसे कोरले हे सांगणारे हे पुस्तक. माझ्या २७ वर्षाच्या २७ अविस्मरणीय आठवणी व शिकवण जी मी कुठल्याच तराजू मधे तोलू शकत नाही, जे माझ्यासाठी अनमोल आहे.
म्हणतात आई-वडील हे पहिले शिक्षक आणि बालपणात पडलेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. या पुस्तकात लेखिकेने बालपणीच्या गमती-जमती, किस्से, कवितांच्या माध्यातुन लिहिलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे आई-वडिलांपासून, भावापासून शिकलेली शिकवण.
हे पुस्तक कुठल्या वयोगटासाठी सिमित नाही, हे पुस्तक त्या सर्वांसाठी आहे जो आपल्या आयुश्याशि मिडते जुळते किससे पुन्हा वाचू पाहतो,अशे अनुभव जे आपला परिवार फार सहजरित्या आपल्याला शिकवून जातो.
Reviews
There are no reviews yet.