Description
‘स्थिर नोकरी’ + ‘गुणी बायको’ = ‘परम सुख’… मिस्टर मोहितेंचं गणित एकदम पक्कं होतं!
पण संसार म्हणजे काही गणिताचं पुस्तक नाही.
जिथे नवरा निरागस व थोडा गोंधळलेला आहे आणि बायको कमालीची हुशार, तिथे ठिणग्या तर उडणारच! ‘टेस्ट मॅच’च्या तयारीने सुरू झालेला हा संसार अचानक ‘T-20’ कधी झाला, हे मोहितेंना कळलंच नाही.
भाजीवरून होणारे वाद, हेडफोनमध्ये दडवलेला रुसवा आणि ‘मांसाहार विरुद्ध शाकाहार’चा महासंग्राम… ही गोष्ट आहे आजच्या काळातल्या अशा एका जोडप्याची, ज्यांच्या चुकांमधून हास्य आणि संकटांतून प्रेम फुलत जातं. पण खरी कसरत सुरू होते जेव्हा
आयुष्यात एक ‘ट्विस्ट’ येतो – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेली हॉस्पिटलची धावपळ!
मिस्टर मोहितेंचा मिसेस मोहितेंसोबतचा- एका साध्या नवऱ्यापासून तर एक जबाबदार ‘वडिल’ होण्यापर्यंतचा हा खुसखुशीत आणि तितकाच भावूक प्रवास.





Reviews
There are no reviews yet.